दुसरे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन
लक्ष्यवेधी परिसंवाद आणि साहित्यिकांचा सन्मान
बडनेरा विदर्भ मतदार प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीम टेकडी अमरावती येथे, शब्दास्त्र विचार मंच,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट द्वारा, राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मुर्तिदिवस,क्रांतिवीर सुखदेवराव तिडके यांच्या जयंती निमित्त, दुसरे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.थाटात पार पडलेल्या साहित्य संमेलनात आंबेडकरी साहित्यिक प्रा.डॉ.भास्कर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादा्चा विषय , आजची युवा पिढी फुले, आंबेडकरी साहित्याच्या प्रवाहात असा ठेवण्यात आला होता.या विषयावर प्रमुख वक्ता डॉ रविकांत महिंदकर ,प्रा.हंसराज रंगारी यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.अध्यक्ष प्रा.डॉ.भास्कर पाटील यांनी आंबेडकरी चळवळीतील जे घटक आहे त्यापासून युवा पिढी अलिप्त आहे. लेखनाचे प्रमाण कमी होत आहे.यासाठी युवा पिढी साहित्याकडे कशी वळता येतील याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.जो आंबेडकरी आहे त्यांच्या पुढचे प्रश्न कधीच संपत नाही असे तत्व बीज अध्यक्षीय भाषणातून पेरले.यानंतर शंन गौरवाचा , साहित्यिकांच्या सन्मानाचा,सत्कार समारंभ कार्यक्रम टी.एफ.दहीवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.प्रमुख पाहुणे पदमाकर मांडवधरे,देवानंद पाटील, प्रा.पंचशील नकाशे, शब्दास्त्र प्रमुख विद्रोही प्रविण कांबळे,अविनाश गोंडाने,पि. ई.गोसावी , भाग्यश्री गाडगे,मंगला मेश्राम,श्री.न.डोंगरे ,देवीलाल रौराळे, ठवरे गुरुजी ,चरणदास नंदागवळी यांच्या उपस्थितीत साहित्यिक कवी शिवा प्रधान,रत्नाकर शिरसाट, प्रेमानंद तिडके, सुरेश मेश्राम,नलिनी नागदिवे,पंकज मेश्राम,प्रविण सरोदे, मधू हिरेकर यांना शाल, सन्मान चिन्ह, पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन राजेश्वरी नंदागवळी यांनी केले तर आभार अर्चना गोसावी यांनी मानले.साहित्य संमेलनास मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
Comments
Post a Comment